Message from श्री. नितीन म. पाटील
सस्नेह प्रणाम……!!!
Corporator Shri Nitin Patil (Ward 29 – Tukaram Nagar)
महानगर पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सर्व मूलभूत सोई सुविधा प्रभागातील नागरिकांना पुरविणे हे माझे आद्य कर्तव्य असून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून विविध सामाजिक – शैक्षणिक – सांस्कृतिक क्षेत्रातील उपक्रमद्वारे प्रभागातील वातावरण सर्वांगानी पोषक बनविणे ही देखील माझी जबाबदारी आहे हे मी जाणतो.
आपण सर्व नागरिक, माझे डोळे आहात, माझे सहकारी हात आहात.
आपल्या चाळ / इमारत / सोसायटीच्या तसेच आजूबाजूच्या परिसरातील ज्या काही सामाजिक समस्या असतील, तक्रारी असतील, अत्तावश्यक सुधारणा होणे गरजेचे असेल त्याबाबतच्या सर्व सूचना आपण माझ्या पर्यंत पोहचवाव्यात, त्यांचे स्वागतच असेल. मी व माझे कार्यालयीन जनसंपर्क प्रतिनिधी त्वरीत आपली समस्या दूर करण्यास सदैव तत्पर आहोत.
तसेच महानगर पालिकेच्या माध्यमातून आपल्या प्रभागात होणारी दैनंदिन स्वच्छता विषयक कामे (घंटागाडी, औषध फवारणी), पाणी पुरवठा व विद्युत पुरवठा बाबत सूचना, आपल्या वॉर्डातील विविध विकासात्मक हाती घेतलेली कामे इ. ची अद्ययावत माहिती आपणांस दिली जाईल तसेचं त्याबाबत आपली बहुमूल्य मते जाणून त्यानुसार यथायोग्य कार्याप्रणाली निश्चितच आखली जाईल.
अशाप्रकारे आपण माझे डोळे व हात बनल्यास अनंत डोळ्यान्नी व हातान्नी एकत्रीत रित्या काम करीत आपला प्रभाग एक आदर्श प्रभाग म्हणून नावारूपाला आणण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.
आपल्या सहकार्याच्या अपेक्षेने
आपला नम्र स्नेहांकित
उपक्रम आणि कार्य






मोफत आरोग्य तपासणी शिबिर
कल्याण डोंबिवली महानगरपालिका मढवी आरोग्य केंद्र यांच्या तर्फे दिनांक ०८ जुलै २०२५ रोजी मातोश्री आनंदीबाई पाटील ग्रंथालय, स्वामी शाळा चौक, आयरे रोड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिरात नागरिकांची विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक असलेल्या नागरिकांना मोफत औषधांचे वाटप देखील करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.






आधार कार्ड नोंदणी व अद्ययावत शिबीर
दिनांक ११ ते १३ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत मातोश्री आनंदीबाई पाटील ग्रंथालय, सुनील नगर येथे आधार कार्ड शिबीर उत्साहात आयोजित करण्यात आले. या शिबिरात नवीन नोंदणी, दुरुस्ती आणि माहिती अद्ययावत करण्याची मोफत सेवा उपलब्ध आहे. नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उपक्रमाला उत्तम आणि सकारात्मक प्रतिसाद दिला.
सुकन्या समृद्धी योजना, पोस्टल जीवन विमा व इतर उपयुक्त योजनांची माहितीही देण्यात आली.





आयरे रोड रेल्वे प्रकल्प
आयरे रोडवरील लक्ष्मण रेषा येथे रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असून नगरसेवक नितीन पाटील यांनी अधिकारी सचिन टिपरे व त्यांच्या सहकाऱ्यांसह स्थळ पाहणी केली.
या भेटीत नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींबाबत चर्चा करून नवीन रस्ता व ड्रेन लाईन बांधकामाची योजना आखण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे काम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच आयरेगाव–आयरे रोड दरम्यान अंडरपास बोगदा बांधणीसाठीही चर्चा करण्यात आली.
दृष्टी (Vision)
नागरिक आणि प्रशासन यांच्यात सशक्त संवाद निर्माण करणे, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचेल आणि त्यावर प्रामाणिकपणे कार्यवाही होईल.
ध्येय (Mission)
प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता या तत्त्वांवर कार्य करून प्रभागातील प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाची पूर्तता पोहोचवणे हेच उद्दिष्ट.
दृष्टी (Vision)
नागरिक आणि प्रशासन यांच्यात सशक्त संवाद निर्माण करणे, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचेल आणि त्यावर प्रामाणिकपणे कार्यवाही होईल.
ध्येय (Mission)
प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता या तत्त्वांवर कार्य करून प्रभागातील प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाची पूर्तता पोहोचवणे हेच उद्दिष्ट.
व्हिडिओ
संपर्क
कार्यालय पत्ता
साई छाया, दत्तनगर – आयरे रोड, डोंबिवली पूर्व
मोबाईल नंबर
+91 9324100100







